Wednesday, 21 August 2019

काही सवयी बापजन्मात बदलता येणार नाहीत, तरीही तुम्ही प्रयत्न करता.


आता मी एवढी पृथ्वीची लढाई वगैरे शब्द टाकून चार लेख लिहिले,
त्यावर पुढील काही पोस्ट्स पाहून तुम्हाला वाटेल कि ,
हे काय भाऊ!
हे तर आम्ही रोज व्हॅट्सऍप वर वाचतोय आणि फॉरवर्ड पण करतोय.
आम्ही ऑलरेडी या गोष्टी करतोय..
जर तुमची रिऍक्शन अशी असेल, तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन!
कारण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहेत.
आता एक पाऊल पुढे टाका, 
आणखी फक्त एका व्यक्तीला तुमच्यासारखं जबाबदार बनवा.
जर तुमच्यासाठी हे नवीन असेल,
तर सर्वात आधी तुमचं अभिनंदन!!
कारण तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात,
आणि हि लढाई लढण्याची तुमची तयारी आहे.
तुम्हाला मी खूप ऑप्शन्स देणार आहे.
त्यामुळे एखादी गोष्ट करता आली नाही तर निराश होऊ नका.
काही सवयी सहज बदलता येतील,
काही बदलणं बापजन्मात शक्य नाही, अस वाटेल.
तरीही तुम्ही प्रयत्न कराल.
आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल,
कि हि कोण आली मोठी शहाणी,
" लोकां सांगे ब्रह्म ज्ञान , आपण कोरडे पाषाण "
तर तसं काही नाहीये.
मी स्वतः केलेल्या काही गोष्टींचे अनुभव तुम्हाला सांगेन,
आणि काही गोष्टी तुमच्यासोबतच मीही करून बघेन.
लक्षात ठेवा, आपल्याला थोडे थोडके परफेक्ट सैनिक नको आहेत,
आपल्याला करोडो सैनिक हवे आहेत, जे थोडे थोडके प्रयत्न करतील.
- समिक्षा साळुंके
- २२-०८-२०१९
... to be continued

No comments:

Post a Comment