Monday, 26 August 2019

मी लालबागच्या राजाशी कट्टी आहे!!

मी लालबागच्या राजाशी कट्टी आहे!!
.
.
.
.
.
.
आणि त्या सगळ्या सो कॉल्ड इकडच्या तिकडच्या राजांशी सुद्धा!
हे सगळे शहाणे मंडळ वाले, इतके चाप्टर आहेत ना.. 
पूरग्रस्तांना मदत पाठवतायत,
इको फ्रेंडली "डेकोरेशन" करतायत,
आणि फेमस होतायत. 

आणि गणेश मूर्ती?
मूर्तीचं काय?
ती कोण इको फ्रेंडली बनवणार?

८ फूट, ११ फूट, १८ फूट एवढ्या एवढ्या उंचीच्या शेकडो काय, हजारो मुर्त्या आजही आपल्या अरबी समुद्रात विसर्जित होत आहेत, आणि त्यासोबत, असंख्य झेंडू च्या फुलांनी भरलेल्या पिशव्या!!
असं कसं चालेल मित्रांनो?
आपण विषारी रसायनांनी भरलेली आपली श्रद्धा पाण्यात नव्हे, करोडो जीवांच्या घरात विसर्जित करतोय.. 
उद्या त्या जीवांनी त्यांच्या शरीरातले केमिकल्स तुमच्या घरात आणून टाकले, तर चालेल तुम्हाला? 
काय हक्क आहे आपल्याला असं वागण्याचा? 
काय समजतो तरी काय आपण स्वतःला?
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, ते सामाजिक संदेश देण्यासाठी..
आपण कोणता संदेश देतोय लोकांना?
आपल्या श्रद्धा परंपरांसाठी मुक्या जीवजंतूंचे प्राण घेण्याचा?
मला खूप राग आहे या गोष्टीचा, 
की ज्या गणेशावर लाखो लोकांची श्रद्धा आहे, 
ज्या मूर्तीची कॉपी करण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा आहे, त्या इतक्या फेमस मंडळाने, एकदाही आपल्या मूर्तीची उंची कमी करण्याचा, किव्वा मूर्ती POP ची न बनवण्याचा प्रयत्न केला नाही?
आजच्या काळात सुद्धा?
या वर्षी ते काय करत आहेत माहीत नाही,
पण नुसती माणसांना मदत करून तुमची पापं धुतली जाणार नाहीयेत..
पृथ्वीची मदत करणं गरजेचं आहे.
मी याबद्दल एक पत्र त्यांना टाकणार आहेच,
पण अशा ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या लोकांचा ओघ थांबायला हवा आहे.
तरच त्या पत्राला योग्य तो सपोर्ट मिळेल.
या मूर्तींची उंची कमी होऊन,
या मूर्ती जोवर मातीच्या बनत नाहीत,
तोवर अशा मंडळांना भेट द्यायची नाही.
माझ्या सांगण्याने तुम्हाला काही फरक पडत नसेल तर DNA ने कांबळींचा घेतलेला हा इंटरव्ह्यू शेवट पर्यंत वाचा, तुमचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही!
ते काका सरळ सरळ सांगतात, आपल्या कल्चर मुळे आपण मूर्तींचे पाण्यात केले जाणारे विसर्जन थांबवू शकत नाही, आणि मूर्तीची उंचीच १८ फूट असल्याने ती नाईलाजाने POP चीच बनवावी लागते.
अरे? मग मूर्तीची उंची कमी करा ना!!
पर्यावरण हानी बद्दल त्यांना प्रश्न केल्यावर, त्यासाठी म्हणे विसर्जनानंतर समुद्राच्या पाण्याची सफाई केली पाहिजे.
पण मुळात आपल्याला ते पाणी घाण करण्याचा हक्कच कोणी दिला?
कम ऑन हं काका,
एक कलाकार म्हणून तरी तुम्ही निसर्गाबद्दल संवेदनशील असायला हवं.
तुमच्या कलेचा अपमान नाही करायचाय मला,
पण शेवटी कलाकाराची वृत्तीच त्याचं अस्तित्व असतं, असं मला वाटतं.
काही फार नाही सांगत आहे मी करायला.
आणि अशक्य पण नाहीये हे.
फक्त अशा मोठ्या गणेश मंडळांना भाव देणं बंद करायचंय आपल्याला.
आणि ज्यांची गणेश मंडळं आहेत त्यांनी आपला गणेशोत्सव इको फ्रेंडली नव्हे तर "झिरो वेस्ट" होईल याची काळजी घ्या.
माझे मित्र म्हणून एवढं तरी या गणपतीत नक्की करा, प्लिज!!

- समिक्षा साळुंके
-२४-०८-२०१९
...to be continued

1 comment:

  1. So according to His Highness Ratnakar Kambli, it is our culture and tradition to destroy the environment. Wow 👏

    Rather this mentality needs to get destroyed first.

    ReplyDelete