सब लोग आप जैसा करे,
तो जगत् का कल्याण हो जावे ।
.
.
.
.
.
हे शब्द आहेत, माझ्या नेहमीच्या किराणा दुकानाच्या मालकाचे..अर्थात मला उद्देशून.
का?
प्लॅस्टिक !
दोन महिन्यांपूर्वी, माझ्याकडच्या प्लॅस्टिकच्या सगळ्या पिशव्या संपल्या.
म्हणजे, ती असते ना आपल्या सगळ्यांच्या घरात एक पिशवी , प्लॅस्टिकच्या पिशव्यानी भरलेली, ती रिकामी झाली.
कारण?
मी त्याच्या आधी जवळ जवळ ६ महिने नवीन प्लॅस्टिकची पिशवी घरात येऊच दिली नाही. तरीही, किराणा घेतल्यावर, धान्यासोबत काही पिशव्या घरात आल्याच.
आता यांचं करायचं काय?
घरातल्या बरण्या किव्वा डब्बे घेऊन त्या दुकानात जाणं, प्रॅक्टिकली शक्य नव्हतं.
मग डोक्यात आलं,
जर या पिशव्या फक्त कॅरियरचं काम करत आहेत,
म्हणजे दुकानातून सामान घरी आलं, की बरण्यांमध्ये जातंय,
तर त्या पिशव्या पुन्हा दुकानात घेऊन जाऊन, त्यात सामान आणणं, किती सहज शक्य आहे.
त्या वापरात राहतील आणि पुन्हा पुन्हा नवीन पिशव्या घरात येणार नाहीत.
मग मी हेच चालू केलं.
या आधी माझ्या बॅगेत नेहमी एक कापडी पिशवी
असायची, त्याच्या सोबत, मी घरातल्या १-२ किलोच्या अशा ४-५ पिशव्या सुद्धा ठेवू लागले.
बाहेरून येता येता जरी काही आठवलं,
तरी सहज आणता येईल,
घरी येऊन पुन्हा जावं लागू नये म्हणून.
आणि त्यांचं वजन असतं तरी किती?
फोल्ड होऊन छान राहतात बॅगेत.
तर असंच, एकदा त्या दुकानात गेल्यावर,
त्याला रवा आणि काळ्या मणुकांसाठी त्या त्या मापाची पिशवी माझ्या बॅगेतून काढून दिली,
तेव्हा त्याचा मालक म्हणाला,
परवाच अर्धा किलो बटाट्यासाठी "वेगळी" पिशवी दिली नाही म्हणून एक गिऱ्हाईक त्याला आईबहिणीवरून शिव्या द्यायला लागला.
अगर सब लोग आप जैसा करे,
तो जगत् का कल्याण हो जावे ।
बस, मला माझ्या कामाची शाबासकी मिळाली!
आणि तुम्हांलादेखील असं करण्यासाठी आग्रह करायचा हक्कसुध्दा मिळाला !
तर आता यापुढे नुसती एक कापडी पिशवी बॅगेत ठेवतो म्हणून टिमक्या मिरवून दाखवू नका,
त्या सोबत या घरातल्या प्लास्टिक च्या पिशव्यांना कामाला लावा.
आणि खरंच जेव्हा महिन्याचा किराणा भरायला आपण घरातून निघतो, तेव्हा आहेत नाहीत तेवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन जायचं आणि भरपूर शॉपिंग करायची!
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे पिशव्या घेऊन डी मार्ट किंवा रिलायन्स च्या सुपर मार्केट मध्ये जाताना सुद्धा लाज बाळगू नका.
तुम्ही रक्षक आहात आपल्या पृथ्वीचे!
त्याचा अभिमान बाळगून, तिकडची सिस्टिम बदलायला त्यांना भाग पाडा.
सगळ्यात सोपा उपाय म्हणजे,
शक्यतो पॅकिंग न केलेले सुटे धान्य विकत घ्या.
प्लॅस्टिक बद्दल मी अजूनही बरंच लिहीन,
पण आज एवढंच!
कारण, एकदम सगळं सांगितलं,
तर विसरलं जाईल.
- समिक्षा साळुंके
- २३-०८-२०१९
...to be continued

No comments:
Post a Comment